शरद पवारांनीही टोचून घेतली कोरोनाची लस

March 01,2021

मुंबई : १ मार्च - कोरोनावर मात करण्यासाठी देशभरात कोरोना लसीकरण सुरू आहे. आज खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत कोरोनाची लस घेतली आहे. त्यांच्यापाठोपाठ आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही कोरोनाची लस घेतली आहे.

राज्यात दुसऱ्या टप्प्यात कोरोना लस देण्याची मोहिम आजपासून सुरू झाली आहे. शरद पवार आज दुपारी 1.30 च्या सुमारास मुंबईतील जेजे रुग्णालयात पोहोचले होते. यावेळी त्यांनी दुसऱ्या टप्यातील लसीकरण कार्यक्रमांतर्गत लस घेतली.

'शरद पवार आणि त्यांच्या पत्नी यांनी सिरम इंस्टिट्यूटची कोविशिल्ड लस घेतली. त्यानंतर त्यांना 30 मिनिटं निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं होतं. दुसरी लस 28 दिवसांनी दिली जाईल. त्यांची प्रकृती पुर्णपणे ठीक आहे', अशी माहिती वैद्यकीय संचालक, डॉ. तात्याराव लहाने यांनी दिली.