डोक्यात लाकूड मारल्याने एकाचा मृत्यू

March 03,2021

यवतमाळ : ३ मार्च - दिग्रस तालुक्यातील आरंभी येथे  काल सायंकाळी  ५ :३0 वाजता क्षुल्लक कारणावरून झालेल्या हाणामारीत एकाच्या डोक्यावर सेन्ट्रिंग लाकूड मारल्याने गंभीर जखमी झाला गंभीर अवस्थेत दिग्रस ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान रात्री ९:३0 वाजता प्राणज्योत माळविल्याची घटना घडली.

सविस्तर वृत्त असे की, मृतक रामेश्वर प्रेमसिंग पवार (वय- २८) रा.आरंभी हा गजानन राजाराम राठोड (वय -४२) रा. आरंभी याला मोबाइलवर नेहमी कॉल करून त्रास देत असल्याच्या कारणामुळे आरंभी येथील सार्वजनिक रस्तावर मृतक रामेश्वर प्रेमसिंग पवार व गजानन राजाराम राठोड यांच्यात वाद होऊन हाणामारी झाली तेव्हा आरोपी गजानन राठोड याने मृतक रामेश्वर पवार यांच्या डोक्यात लाकडी सेंन्ट्रिंग लाकूड मारून जखमी केले. आरोपी दीपक राजाराम राठोड (४२) , माणिक राजाराम राठोड (वय ३८), योगेश गजानन राठोड (वय १७) रा.आरंभी यांनी रॉड व काठीने मारहाण केली त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची तक्रार दिग्रस पोलिसात फियार्दी भारत बद्री पवार याने दिली. या प्रकरणी दिग्रस पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा करून मृतदेहाचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयात करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. मृतकाच्या पश्चात आई, वडील, पत्नी व २ मुले असा परिवार आहे. या प्रकरणी दिग्रस पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद केला असून या मधील एक आरोपी विधी संघर्ष बालक असल्याने त्याच्यावर विधी संघर्ष बालक कायद्याने कारवाई करण्यात येणार आहे. या प्रकरणी पुढील तपास ठाणेदार सोनाजी आमले, पोलिस हेड कॉन्स्टेबल रवींद्र जगताप, नरेंद्र पुंड व ब्रह्मदेव टाले करीत आहे