मोबाईल आणि वॉच दुकानातील एक लाख ८३ हजाराची चोरी पकडली

March 03,2021

वाशीम : ३ मार्च - १७ जानेवारी रोजी मध्यरात्री नंतर शहरातील न्यू वॉच व मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी आरोपीस अटक करण्यात पोलिसांना यश आले. याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारकर्ते शेख शकील शेख मुसा यांच्या मालकीच्या असलेल्या जुने बसस्थानक परिसरातील न्यू वॉच व मोबाईल दुकानात अज्ञात चोराने चोरी करून 1 लाख 83 हजार 590 रुपये किंमतीचे मोबाईल व घड्याळ लंपास केल्याची घटना घडली होती.

मोबाईल लोकेशेन व सीसी फुटेजच्या मदतीने पोलिसांनी आरोपी संतोष खिल्लारी रा. गोरेगाव जि. हिंगोली यास ताब्यात घेवून पोलिसी खाक्या दाखविला असता त्याने उपरोक्त दुकानात चोरी केल्याची कबुली दिली. चोरीच्या दिवशी चोरट्यानेरात्री स्वतःची मोटरसायकल पोलिस ठाण्याच्या आवारातच उभी केली होती. त्यानंतर चोरी करून पुन्हा दूचाकी ठाण्याच्या आवारातून घेऊन गेला होता हे विशेष. पुढील तपास ठाणेदार आधारसिंग सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.