खोटी कागदपत्रे करून हडपलेल्या जमिनीवर इमारत बांधून सदनिका विकल्या, गुन्हा दाखल

March 03,2021

नागपूर : ३ मार्च - बनावट कागदपत्रे आणि खोटे मृत्यूपत्र सादर करून तीन आरोपींनी त्यांच्या नातेवाईकांना फसवित वडिलोपार्जित  जमीन स्वत:च्या नावावर करून घेतली. तसेच त्या जमिनीवर सदनिका तयार करून ती विकून नातेवाईकांची ६ कोटी रुपयांनी फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी प्रतापनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्वावलंबीनगर येथे राहणारे बाबुराव दमडू मेश्राम  (७0) विर्शामनगर जरीपटका येथे राहणारे रवींद्र पांडुरंग मेश्राम (५७) भामटी रोड येथे राहणार्या मीनल नरहरी कावळे (४८) यांनी संगनमत करून प्रतापनगर हद्दीत मौजा भामटी खसरा क्र. ८२/१, ८२/२, मौजा भामटी येथील खसरा क्र. ७८, ८२/२ आणि ८0/३ भूमापन क्र.४३ /१ या जमिनीवर चिंढू ऊर्फ चंदू कवडूजी मेश्राम रा. गोपालनगर आणि त्यांचे इतर नातेवाईक यांचा कायदेशीर वडिलोपाजिर्त हक्क असतानासुद्धा ४ डिसेंवर १९९९ रोजी नगर भूमापन कार्यालय क्र. ३ या कार्यालयात संपूर्ण वारसदारांची नावे लपवून खोटी माहिती आणि बनावट मृत्यू पत्राच्या आधार त्यांनी त्यांची नावे चढवून त्या भूखंडावर ११ माळ्यांची इमारत तयार केली. आरोपींनी त्यांच्या नातेवाईकांची ६ कोटी रुपयांनी फसवणूक केली.