लोणारमध्ये तीन दुकानांना आग लागून लाखो रुपयाचे नुकसान

March 03,2021

बुलडाणा : ३ मार्च - बुलढाणा जिल्ह्यातील लोणार शहरातील मुख्य रस्त्यावरील ३ दुकानास आग लागल्याची घटना घडली. या आगीत कपडा दुकान, स्टेशनरी व किराणा दुकानातील लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे. 2 मार्च (मंगळवार)च्या सायंकाळी ही घटना घडली. ही आग कश्यामुळे लागली याचा तपास सुरू आहे.

लोणार शाहरात हिरडव चौकामध्ये शरद किराणा, जैन कलेक्शन व शुभमंगल कापड केंद्र या 3 दुकानास गुरुवारी सायंकाळी दरम्यान अचानक आग लागली. ही आग प्रथम शरद किराणा दुकानास लागली. आगीचे रौद्र रूप पाहाता सर्वत्र हाहाकार झाला. पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण करत शेजारी असलेल्या जैन कलेकशन व शुभमंगल कापड केंद्रालाही आगीने आपल्या चपाट्यात घेतले. आगीची बातमी शहराभर पसरताच सर्वत्र नागरिकची आग विझविण्यासाठी प्रयत्न करत होते. लोणार नगर परिषदेचे अग्नीशामक दल तसेच शहरातील खाजगी ट्रॅक्टरने पाणी आणत आग विझविण्यास प्रयत्न करण्यात आला. मात्र, आगीचे रौद्र रूप पाहता आग विझविण्याची क्षमता कमी पडत होती. तब्बल २ तासानंतर आग विझवण्यात यश आले. 

या आगीमध्ये तिन्ही दुकानाचे सर्व साहीत्य जळुन अंदाजे ६० ते ७० लाखांचे नुकसान झाले आहे. आग विझवताना अग्नीशामक दलाचे कर्मचारी शेख खालीक वाहनावरून पडल्याने गंभीर जखमी झाले आहे. मात्र. आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाली नाही.