शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत दोन शेतकऱ्यांचे घर आणि गुरेगोठा भस्मसात

March 04,2021

भंडारा : ४ मार्च - साकोली जवळील सराटी येथे  अचानक शॉर्टसर्कीटने लागलेल्या आगीत दोन शेतकर्यांचे गुरेकोठा घर भस्मसात झाले. या आगीवर ताबडतोब सरपंच पवनकुमार शेंडे व गावकर्यांच्या मदतीने ताबा मिळवित परीसरातील मोठी जीवितहानी व वित्तहानीवर वेळीच नियंत्रण मिळविल्याने अनर्थ टळला. घटनास्थळी साकोली पोलिस व तलाठी यांनी भेट देत पंचनामा करण्यात आला. 

सराटी येथील शेतकरी जगन्नाथ शेंडे व काशिनाथ जयपाल शेंडे यांच्या घर वसाहत असलेल्या कोठ्याला आगीने पेट घेतला. आगीचा आगडोंब दिसताच सरपंच पवनकुमार शेंडे यांनी त्वरीत आरडाओरड करीत परीसरातील नागरिकांच्या मदतीने या आगीवर ताबडतोब नियंत्रण मिळवित मोठा अनर्थ टाळला. या आगीत शेतकर्यांचे लाकडी कृषि अवजारे, फाटे, तणीस व इतर कृषिविषयक साहित्य आणि लाकडी अवजारे यात भस्मसात झाल्याने दोन्ही शेतकर्यांचे ७0 ते ८0 हजारांच्यावर नुकसान झाल्याचे शेतकर्यांनी सांगितले. घटनास्थळी साकोली पोलिस व तलाठ्यांनी येत पंचनामा करीत घटनेची नोंद केली.