मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन

March 04,2021

यवतमाळ : ४ मार्च - राज्यातील मातंग समाजाच्या अनेक मागण्या अनेक वषार्पासून प्रलंबीत असून त्या तात्काळ सोडविण्यासाठी आ. नामदेव ससाणे आणि आ. सुनिल कांबळे यांनी मुख्यमंत्र्याला निवेदन दिले. या निवेदनामध्ये लहुजी साळवे आयोगाच्या शिफारसी त्वरीत लागू करण्यात याव्या, मातंग समाजास अ, ब, क, ड, अनुसार वर्गवारी करून स्वतंत्र आरक्षण लागू करावे, साहीत्य रत्न अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न  पुरस्कार देण्यात यावा, आद्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांचे संगमवाडी येथे भव्य स्मारकाचे काम तातडीने पुर्ण करावे , मुंबई विद्यापिठास साहित्यरत्न  अण्णाभाऊ साठे यांचे नांव देण्यासाठी शासनाने त्वरीत मंजूरी दयावी, गंजपेठ पुणे येथील देशातील पहिली व्यायामशाळा सुरू करून येथे अनेक क्रांतीकारक घडविणार्या लहुजी वस्ताद यांच्या क्रांती शाळेस लहुजी वस्ताद साळवे याचे राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषीत करावे, लहुजी साळवे यांचे नांव राष्ट्रपुरुषांच्या यादीत समाविष्ट करावे, साहित्यरत्न  अण्णाभाऊ साठे महामंडळातर्फे थेट कर्ज प्रकरण त्वरीत सुरू करावे, अण्णाभाऊ साठे थकीत कर्ज माफ करावे मातंग समाजाच्या या सर्व मागण्यावर शासनाने लक्ष घालूण लवकरात लवकर या मागण्या मान्य कराव्यात यासाठी आमदार नामदेव ससाणे आणि आमदार सुनिल कांबळे यांनी आंदोलन केले. 

 तसेच गंजपेठ पुणे येथील देशातील पहिली व्यायामशाळा सुरू करून येथे अनेक क्रांतिकारक  घडविणार्या लहुजी वस्तादांच्या व्यायामशाळेस लहुजींचे राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे, लहुजींचे नाव राष्ट्रपुरुषांच्या यादीत समाविष्ट करावे, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे महामंडळातर्फे थेट कर्जवाटप सुरू करावे, अण्णाभाऊ साठे थकीत कर्ज माफ करावे, मातंग समाजाच्या या सर्व मागण्यांमध्ये शासनाने लक्ष घालून या मागण्या त्वरित मान्य कराव्यात यासाठी आमदार नामदेव ससाणे आणि आमदार सुनील कांबळे यांनी विधानसभा प्रांगणात आंदोलन केले.