धावपटू अतुलकुमार चौकसेने केला नवा विक्रम

March 04,2021

नागपूर : ४ मार्च - नागपूर शहरातील प्रतिभावंत अल्ट्रा मॅरेथॉन धावपटू अतुलकुमार चौकसे याने राजस्थानातील थार वाळवंटात तब्बल ५२ दिवस १ हजार ५५१ किमी अंतर धावून तसेच चालून यशस्वीरित्या पूर्ण केले. त्याच्या या धाडसाचे देशभर कौतुक होत असून या कामगिरीची जागतिक विक्रमात नोंद व्हावी यासाठी अतुल प्रयत्नशील आहे. अतुलकुमारने यापुर्वी अनेक ठिकाणे यशस्वीपणे धावून पूर्ण केले. परंतू थार वाळवंटात त्याच्या सोबतीला कोणीही नव्हते. भ्रमंतीदरम्यान अंधश्रद्धेचा त्याग, रुढी परंपरा सोडण्याचे आवाहन त्याने जनतेला केले. 

अतुलच्या प्रवासाची सुरुवात ३१ डिसेंबर २०२० ला गुजरातच्या कच्छ भागातील भारत पाकिस्तान सीमेवरुन केली. या थरारक मोहिमेतील अनुभव सांगतांना अतुल म्हणाल, प्रवासादरम्यान सोबत स्लीqपग बॅग, खाण्याच्या वस्तू, पाणी, सोलर बॅटरी, वैद्यकीय किट आणि विषारी प्राण्यांपासून संरक्षणासाठी औषधे देखील घेतली होते. सर्व सामान एका ट्रालित टाकून धावत होतो. हे वजन १६० किलो होते. मिठागरे असलेल्या थारच्या वाळवंटातून धावतांना पायांना अनेक जखमा झाल्या, ट्रॉलिचे टायरही अनेकदा फाटले, जालोर आणि बाडमेर या गावांना भेटी देत स्थानिकांना शिक्षणावर भर देण्याचे आवाहन केले. यावेळी स्थानिकांनी देखील माझे स्वागत अनेक ठिकाणी केल्याचे त्याने सांगितले. 

या काळात किराडू येथील पंधराशे वर्षे जुन्या qहदू मंदिरावर एक डाक्यूमेंट्री तयार केल्याचे त्याने सांगितले. जैसलमेर येथील डेझर्ट नॅशनल पार्कला भेट देत १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धातील अनेक गोष्टी जाणून घेतल्या. यानंतर कुलधरा या निर्जनस्थळी तंबूत रात्री मुक्काम केला. गेल्या सातशे वर्षापासून येथे कोणी राहत नसल्याची माहिती मिळाली. या ठिकाणी आजही पाच हजार घरांचे अवशेष पहायला मिळतात. 

भारताने यशस्वी अनुचाचणी केलेल्या पोखरणलादेखील भेट दिली. बिकानेर, श्रीगंगानगर, सुरतगड, हनुमान गड या मार्गात हडप्पा संस्कृतीचे अवशेष पहायला मिळाले. पंजाबमधील भqटडा येथे २१ फेबु्रवारीला या मोहिमेची सांगता झाली. समाजात दहापैकी चारजण विमनस्क मानसिकतेमुळे आत्महत्या करतात. आत्महत्या न करता समस्यांचा यशस्वी सामरा करा हा संदेश देण्यासाठी आपण ही मोहीम हाती घेतली असून ती यशस्वीरित्या पूर्ण केल्याचा आनंद वाटत असल्याची भावना त्याने बोलून दाखविली.