महाराष्ट्र वुशू संघाची चंदीगडमध्ये दमदार कामगिरी

March 04,2021

नागपूर : ४ मार्च - मोहालीतील चंदीगढ विद्यापीठ येथे झालेल्या २९ व्या सिनिअर राष्ट्रीय वुशू अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्र वुशू संघाने दमदार कामगिरीचे प्रदर्शन करीत १ सुवर्ण पदक, २ रौप्य पदक व २ कांस्य पदक प्राप्त केले आहे. २५ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत देशातील राज्य, केंद्रशासित प्रदेश व सर्विसेस असे सर्व मिळून अंदाजे ४२ वुशू संघाने सहभाग नोंदविला. यात मुले व मुली मिळून जवळपास ८५० ते ९०० खेडाळू उपस्थित होते. ही स्पर्धा सांशू व तावलू या दोन्ही प्रकारात घेण्यात आली. यात ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशनच्या संघाने १ सुवर्ण पदक, २ रौप्य पदक व २ कांस्य पदकांची उत्कृष्ट कामगिरी केलेली. 

स्पर्धेत तावलू (कुंफु तायची फॅन) मध्ये श्रावणी सोपान कटकेने सुवर्ण व रौप्य पदक प्राप्त केले. तर तावलू (कुंफु - बेअर हाफ नॅर्थन स्टाईल) मुली - स्नेहल बडस्करने रौप्यपदक, तावलू(कुंफु- तायची फॅन) मुलींमध्ये मिताली मिqलद वाणीने रौप्यपदक, तावलू(तायचीकॉन) मुली - श्रावणी सोपान कटकेने कांस्यपदक, तावलू (तायचीकॉन) मुली - मिताली मिqलद वाणीने कांस्यपदक प्राप्त केले. खेळाडूंना ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशनचे सचिव सोपान शंकर कटके, संघ व्यवस्थापक दिपक भिमराव माळी(राज्यस्तर खेडाळू) व प्रशिक्षक संदिप सयाजी शेलार (शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त) यांचे मार्गदर्शन लाभले होते. 

तत्पुर्वी स्पर्धेचे उद्घाटन पंजाबचे क्रीडामंत्री सुरेंद्रqसहजी सोढी यांच्या हस्ते करण्यात आले. तर स्पर्धेच्या बक्षिस वितरण समारंभासाठी वुशू असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष भूपेंद्र बाजवा, सीईओ सोहेल अहमद, सहसचिव सोपान शंकर कटके व द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त कुलदिपसिंह  हंडू हे उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळलेले खेळाडूंना रौप्य व कांस्य पदकांवरती समाधान मानावे लागले यामाध्यमातून वुशू खेळाचा स्तर उत्कृष्ट प्रकारे वाढत आहे. तसेच स्पर्धेमध्ये अर्जुन पुरस्कार प्राप्त खेडाळू, महाराष्ट्राचे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त झालेले खेळाडू सहभागी झाले होते.