नक्षलवाद्यांनी पेरलेल्या स्फोटकांच्या स्फोटात तीन जवान शहीद तर दोन जखमी

March 04,2021

राची : ४ मार्च - नक्षलवाद्यांनी पेरून ठेवलेल्या ‘आयडी’ च्या स्फोटात झारखंड जग्वार युनिटचे तीन जवान शहीद झाले, तर अन्य दोन जवान जखमी झाले. सीआरपीएफ आणि झारखंड जग्वार यांचे संयुक्त पथक शोध मोहीम राबवित आहे. झारखंडचे डीजीपी नीरज सिन्हा यांनी ही माहिती दिली आहे.

आज(गुरूवार) सकाळी ८.४५ मिनिटांनी झारखंडमधील पश्चिम सिंगभूममधील होयाहातू गावच्या वनक्षेत्रात प्रेशर आयडीचा स्फोट झाला.