सांची जीवने ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - 11 व्या दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे पुरस्कार घोषित

May 02,2021

नागपूर -  भारतीय चित्रपटांचे जनक दादासाहेब फाळके यांच्या  जयंतीप्रीत्यर्थ दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय दादासाहेब फाळके चित्रपट पुरस्काराची काल घोषणा करण्यात आली. त्यात नागपूरची नाट्य-सिने कलावंत सांची जीवने हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार जाहीर झाला आहे. नागपूर येथील व्हीएमव्ही कॉलेजमध्ये सांची सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. 

नागपूर येथे गतवर्षी निर्मित पैदागीर या मराठी चित्रपटातील प्रमुख भूमिकेत सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी तिला हा पुरस्कार मिळाला 

आहे. USA, स्वित्झर्लंड, स्पेन, कॅनडा, UK, तुर्की, चीन, जर्मनी, भारत आणि इतर काही देशांमधून 310 चित्रपटांचा अंतिम नामांकनामध्ये समावेश होता. 

याआधी फिल्म डिव्हिजनचा सर्वोत्कृष्ट शैक्षणिक  चित्रपटाचा पुरस्कार देखील या चित्रपटाला मिळाला आहे. याशिवाय विविध चित्रपट महोत्सवांमध्ये चित्रपटास पुरस्कार आणि नामांकने मिळाली आहेत.

पैदागीर या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक संजय जीवने असून गतवर्षी नागपूर येथील कलावंतांना घेऊन सम्मा दिठ्ठी फिल्म्सने पैदागीर चित्रपटाची निर्मिती केली हे विशेष.