छत्रपती प्रतिष्‍ठानच्‍या कार्याचे राज्‍यपालांनी केले कौतूक

June 15,2021

नागपूर, विविध उपक्रमांच्‍या माध्‍यमातून सकारात्‍मक निर्माण करणा-या छत्रपती सेवा प्रतिष्‍ठानच्‍या कार्याचे महाराष्‍ट्राचे राज्‍यपाल भगत सिंग कोश्‍यारी यांनी कौतूक केले. पुढील कार्यासाठी त्‍यांनी शुभेच्‍छा दिल्‍या.

छत्रपती सेवा प्रतिष्‍ठानच्‍या सदस्‍यांनी रविवारी राजभवन येथे जाऊन राज्‍यपाल भगत सिंग कोश्‍यारी यांची भेट घेतली. यावेळी प्रतिष्‍ठानचे अध्‍यक्ष अजेय देशमुख, सचिव संजय देशकर, विश्‍वस्‍त संजय बारहाते, सुनील उबाळे व प्रसन्‍न बारलिंगे यांची उपस्थिती होती.

अजेय देशमुख यांनी प्रतिष्‍ठानच्‍या कार्याची राज्‍यपालांना माहिती दिली. सोबतच, प. पू. सद्गुरुदास महाराज (श्री. विजयराव देशमुख) लिखित शककर्ते शिवराय' या ग्रंथाची हिंदी आवृत्‍ती 'शकनिर्माता शिवराय' चे दोन खंड राज्‍यपालांना भेट स्‍वरूपात देण्‍यात आले. राज्यपालांनी छत्रपती सेवा प्रतिष्ठानचे कार्य तसेच, सद्गुरुदास महाराजांचे शिवकार्य व आता देश-विदेशात असलेल्या विविध शुद्ध उपासना केंद्रांमार्फत होणारे राष्ट्रकार्य  मोठ्या उत्सुकतेने जाणून घेतले. 'महाराजांचे शिवकार्य फार मोठे व मोलाचे असून अशा कार्याची आता फार गरज आहे. सद्गुरूदास महाराजांनी लिहिलेल्‍या या ग्रंथाचा मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसार होण्‍याची गरज असल्‍याचे ', असे म्‍हणत राज्‍यपालांनी प्रतिष्‍ठानच्‍या कार्याला शुभेच्छा दिल्या.