सात सदस्यीय समिती करणार परमबीर सिंह यांची चौकशी

July 28,2021

मुंबई : २८ जुलै- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. परमबीर सिंह यांच्यासह सहाजणांवरील भ्रष्टाचाराचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांनी आज बुधवारी सात सदस्यीय समितीची स्थापना केली असून त्याचे अध्यक्ष पोलीस उपायुक्तस्तरीय अधिकारी असतील. काही दिवसांपूर्वी बांधकाम व्यवसायिकाकडे खंडणी मागितल्याप्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह आठजणांवर मरिन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असतानाच त्यापाठोपाठ आणखी एक खंडणीचा गुन्हा परमबीर सिंह, पोलिस उपायुक्त पराग मणेरे यांच्यासह पाचजणांवर ठाणे शहरातील कोपरी पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. या प्रकरणात आमदार गीता जैन यांचा भाऊ संजय पुनामिया आणि सुनील जैन या दोघांना अटक करण्यात आली. दरम्यान, हे जुने प्रकरण पुन्हा उकरून काढले असल्याची चर्चा होती.