युवक काँग्रेसच्या "आजादी तिरंगा गौरव यात्रेने" वेधले लक्ष

August 16,2022

भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाले असून अमृत महोत्सवी वर्ष म्हणून सर्वत्र साजरे करण्यात आले. या निमित्ताने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यदिनी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या नेतृत्वात "आजादी गौरव तिरंगा यात्राचे" आयोजन करण्यात आले होते.

भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाले. अमृत महोत्सवाच्या जल्लोषासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, काँग्रेस सेवादलतर्फे जरीपटका पोलिस स्टेशन चौकातून रॅलीला सुरुवात झाली. स्वातंत्र्यप्राप्तीच्या 75 व्या वर्षानिमित्त युवक काँग्रेसतर्फे 75 मीटर लांब असा भव्य तिरंगा हातात घेऊन युवक काँग्रेसचे कार्यकर्ते जल्लोषात मार्गक्रम करीत होते. 'भारत माता की जय' च्या घोषणांनी हा परिसर दणाणला होता. छत्रपती शिवाजी महाराज, झाशीची राणी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर,  महात्मा गांधी यासारख्या थोर महापुरुषांच्या वेशभूषेतील चिमुकले आणि घोड्यावरील भारतमाता या रॅलीचे आकर्षण ठरले होते.

जरीपटका पोलीस स्टेशन चौकात भारत मातेला नमन करून तिरंगा यात्रेला सुरुवात झाली. भीम चौक, जरीपटका, बाराखोली, इंदोरा चौक, डॉ. आंबेडकर मार्ग, कमाल चौक असा मार्गक्रम करीत कमाल चौकात राष्ट्रगीत आणि भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकाचे पठण करून तिरंगा यात्रेचा समारोप झाला. महिला काँग्रेसच्या 500 हून अधिक महिला कार्यकर्त्या, काँग्रेस सेवादल, युवक काँग्रेसचे हजारो पदाधिकारी व कार्यकर्ते पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून सहभागी झाले होते. या मार्गावरील प्रत्येक चौकात नागरिकांनी पुष्प वर्षाव करीत रॅलीचे स्वागत केले. प्रत्येकाच्या हातात तिरंगा झेंडा डौलाने लहरत होता

याप्रसंगी सेवा दलचे कृष्ण कुमार पांडे, संजय दुबे, माझी ज्येष्ठ नगरसेवक परसराम मानवटकर, राष्ट्रीय युवक काँग्रेसचे सचिव व गुजरातचे प्रभारी अजित सिंग, युवक काँग्रेसचे महासचिव श्रीनिवास नालमवार, आसिफ शेख, सतीश पाली, युवक काँग्रेसचे उत्तर नागपूर विधानसभा अध्यक्ष निलेश खोब्रागडे, महासचिव दुर्गेश पांडे, निशाद इंदूरकर, उत्तर नागपूर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा कल्पना द्रोणकर, उत्तर नागपूर काँग्रेस एससी सेलचे अध्यक्ष गौतम अंबादे, ओबीसी सेलचे अध्यक्ष चेतन तरारे, सोनू खोब्रागडे, ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष मुलचंद मेहर, माजी ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष खुशाल हेडाऊ, राकेश निकोसे, कुणाल वासनिक, सचिन वासनिक, बाबू खान, अनिरुद्ध पांडे, संतोष खडसे, सचिन डोहाने, संगीता टेंभुर्णे, रेखा लांजेवार, ललिता गायकवाड, कुंदा राऊत, सादिक अली, प्रकाश नांदगावे, इम्रान खान, चेतन मेश्राम व युवक काँग्रेस तसेच उत्तर नागपूर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी व हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.