'क्वेल रनवे' १५ ऑक्टोबरला ला शहरात

September 20,2022नागपूर : नागपुरात फॅशन डिझाईनला प्रोत्साहन मिळावे, यासाठी 'क्वेल रनवे' नावाने फॅशन शोचे आयोजन १५ ऑक्टोबरला शहरातील जगनाडे चौकातील रेजिंटा हॉटेलमध्ये करण्यात आल्याची माहिती फॅशन डिझाईनर शेफाली मेश्राम यांनी पत्रपरिषदेत दिली. 

नागपूरमध्ये फॅशन डिझाईनला चांगले व्यासपीठ अजूनही उपलब्ध नाही. त्यासाठी नागपूरच्या डिझाईनरला बाहेर मोठ्या शहरात जावे लागते. त्यामुळे नागपूर फॅशन डिझाईनच्या मोठ्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि नागपूर यासाठी प्रोत्साहित व्हावे, म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन असल्याचे शेफाली यांनी पत्रपरिषदेत सांगितले. या दरम्यान आम्ही खादीला प्रोस्ताहित करणार आहोत. तसेच उन्हाळा, हिवाळा व लग्नाच्या मोसमात कशा प्रकारचे वस्त्र परिधान करावे, याची माहिती सुद्धा देणार असल्याचे त्यांनी सांगितले.