‘विजयादशमी’ चे आज प्रकाशन डॉ. मोहन भागवत यांच्या भाषणांचा मराठी अनुवाद
October 03,2022
नागपूर, 3 ऑक्टोबर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी विजयादशमी उत्सवप्रसंगी केलेल्या हिंदी भाषणांचा मराठी अनुवाद असलेल्या ‘विजयादशमी’ या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवार, 4 ऑक्टोबर रोजी होत आहे. ज्येष्ठ अनुवादक व मुलाखतकार शुभदा फडणवीस यांनी हा मराठी अनुवाद केला असून विद्या विकास पब्लिशर्सद्वारे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. डॉ. मोहन भागवत यांची भाषणे पहिल्यांदाच या पुस्तकाच्या माध्यमातून मराठी भाषेत उपलब्ध झालेली आहेत.
विवेकानंद सोसायटी हॉल, चिटणीस पार्क, महाल येथे दुपारी 4 वाजता होणा-या या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांच्या हस्ते प्रकाशन सोहळा होईल. कार्यक्रमाला नागपूर महानगरचे सहसंघचालक श्रीधर गाडगे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन विद्या विकास पब्लिशर्सचे निलेश देशपांडे यांनी केले आहे.