गुढीपाडव्याच्या पूर्व संध्येला शहरात महिलांची अभिनंदन स्कूटर रॅली

March 21,2023

(फोटो : चंद्रकांत भि. पडधाने)

नागपूर : भारतीय नववर्ष स्वागत समिती इतवारी विभागातर्फे आज मंगळवार ला गुढीपाडव्याच्या पूर्व संध्येला शहरात महिला अभिनंदन स्कूटर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचा शुभारंभ गणेशपेठ येथील आग्याराम मंदिर येथून कारण्यात आला. त्या नंतर रॅली मुळे पेट्रोल पंप दत मंदिर, टिळक पुतळा, शिवाजी पुतळा, चिटणीस पार्क, पंडित बच्छराज व्यास चौक ,बडकस चौक, गांधी पुतळा,टांगा स्टॅन्ड, नंगा पुतळा ,भारत माता चौक, गोळीबार चौक ,डागा हॉस्पिटल, हंसापुरी मोमीनपुरा, अशा विविध मार्गाने फिरून श्री पोद्दारेश्वर राम मंदिर येथे रॅलीचे समापन करण्यात आले. 


रॅली मध्ये सामील होणाऱ्या प्रत्येक महिलेला रोकडे ज्वेलर्स तर्फे नथ भेट देण्यात आली. या रॅली मध्ये महिलांनी उत्स्फूर्त भाग घ्यावा म्हणून स्वरचित घोषवाक्य स्पर्धा, स्कूटर सजावट स्पर्धा, उत्कृष्ट वेशभूषा स्पर्धेचे, आयोजन करण्यात आलेले होते. स्पर्धेतील विजेत्या महिलेला राजलक्ष्मी साडी तर्फे ब्रॉकेट पैठणी देण्यात येणार आहे तसेच उत्तेजनार्थ प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. रॅलीच्या आयोजनात रोकडे ज्वेलर्स आग्याराम मंदिर ट्रस्ट, पोद्दारेश्वर राम मंदिर , राजकारणे मीडीया वेव्हज् , श्री संती गणेशोत्सव मंडळ, राजलक्ष्मी साडी यांनी सहकार्य केले. या रॅलीमध्ये शेकडो महिलांनी सहभागी होऊन नागपूरकरांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.


 या रॅली ला यशस्वी करण्या करिता रॅलीच्या संयोजिका सौ. श्रद्धा पाठक यांनी अथक प्रयत्न केलेत. तसेच रॅलीच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न आणि रॅलीचे मार्गदर्शन सहसंयोजिका कविता इंगळे, रेखा निमजे, नीरजा  पाटील, कल्पना मानपुरे, सविता उमाटे, माधुरी बालपांडे, गीता पार्डीकर ,सुनीता मौदेकर, शरयू चितळे, आरती राजकारणे, भूषणा भोंगाडे ,मंदा पाटील, श्रद्धा आळसपुरे, माधुरी मांजरे यांनी केले.