अनुसूचित जमातीच्या मुला-मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

June 01,2023

नागपूर : राज्यातील अनुसूचित जमातीच्या मुलामुलींना परदेशातील शिक्षणाची संधी मिळावी व त्यांच्या गुणवत्तेला वाव मिळावा म्हणून परदेशातील विद्यापीठामध्ये विविध पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी ज्या आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल अशा राज्यातील एकूण 10 विद्यार्थ्यांना परदेशातील शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते.  या शिष्यवृत्ती योजनेचा अनुसूचित जमातीच्या मुलामुलींनी लाभ घ्यावा, असे आवाहन आदिवासी उपायुक्त डी. एस. कुळमेथे यांनी केले आहे.

परदेशी विद्यापिठाचे जागतिक रँकींग (Latest QS world Ranking) ३०० पर्यंत असलेल्या महाविद्यालयात प्रवेश मिळालेला असल्यास व ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 6 लक्षापर्यंत आहे अशा अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी लाभ घेण्यासाठी व योजनेच्या अधिक माहितीकरीता संबंधित प्रकल्प अधिकारी नागपूर, वर्धा, भंडारा, देवरी, चंद्रपूर, चिमूर, गडचिरोली, अहेरी, भामरागड या कार्यालयाशी व अपर आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.