वनसंवर्धन प्रत्‍येक नागरिकाची जबाबदारी : अभिनेत्री स्‍नेहल राय

June 03,2023

वट वृक्षारोपण’ महोत्सवाचे थाटात उद्घाटन 

नागपूर : एक अभिनेत्री या नात्‍याने लोकांचे मनोरंजन करणे ही जशी माझी जबाबदारी तशी वनांचे संवर्धन करणे ह माझ्यासह प्रत्‍येक नागरिकाची जबाबदारी आहे, असे मत नटराज निकेतन संस्था “बनियान ट्री प्लांटेशन फेस्टिवल ग्लोबलची ब्रांड एंबेसडर अभिनेत्री स्नेहल राय यांनी व्‍यक्‍त केले. 

जलसंवर्धनासाठी महत्वाचे पाऊल म्हणून बहुगुणी वटवृक्षाचे रोपण करा, असा संदेश देण्यासाठी ऩटराज निकेतन संस्था, नागपूर च्‍या पुढाकाराने आणि मैत्री परिवार संस्थेच्‍या सहकार्याने “वटवृक्ष रोपण’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उदघाटन शनिवारी ‘वटसावित्री’ला नागपूर आणि चंद्रपूर येथे करण्यात येणार आले. 

नागपुरात झालेल्या कार्यक्रमाला स्‍नेहल राय, विभागीय वन अधिकारी गीता नन्नावरे यांच्यासह नटराज निकेतन संस्थेच्या अध्यक्षा मंगला पात्रीकर, सचिव मुकुंद पात्रीकर, मैत्री परिवारचे प्रमोद पेंडके, डॉ. भावना सलामे – कुलसुंगे यांच्‍यासह अनेक मान्‍यवर उपस्‍थ‍ित होते. 

आपण पृथ्‍वीचा सन्‍मान केला नाही तर कोविडसारखी संकटे येऊ शकतात. झाडे ही आपला श्‍वास आहेत. त्‍यामुळे प्रत्‍येकाने एकतरी झाड लावणे आवश्‍यक असून या मोहिमेत तरुणांचा सहभाग वाढवण्‍याची गरज आहे, असे स्‍नेहल राय म्‍हणाल्‍या. गीता नन्‍नावरे यांनी नटराज निकेतनच्‍या वटवृक्ष रोपण मोहिमेचे कौतुक केले. पहिल्‍यांद एखाद्या सामाजिक संस्‍थेने वनविभागाच्‍या सहकार्याने हा उपक्रम राबवल्‍याबद्दल त्‍यांनी आभार मानले. 

प्रास्‍ताविकातून मुकुंद पात्रीकर यांनी भारतभरातील तब्बल ३०० पेक्षा जास्त समाजसेवी संघटना कार्याच्या यशश्वीतेसाठी कार्य करीत असून ९ जुलै रोजी संपूर्ण भारतात हा महोत्‍सव राबवला जाणार आहे. या वटवृक्षारोपण महोत्सवाची नोंद  ‘गिनिज बुक ऑफ़ वर्ल्ड रिकॉर्ड’ मध्ये केली जाणार असल्‍याची त्‍यांनी माहिती दिली. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. मधुरा व्यास यांनी केले. तर मुकुंद पात्रीकर यांनी आभार मानले.