*हर्षदच्या उच्चभ्रू समाजाच्या दिवाळी पार्टीचे नियोजन करण्यासाठी प्रख्यात अभिनेत्री मोनाज मेवावाला हिची सेनोरिटा कपूर म्हणून सोनी सबवरील वागले की दुनिया मालिकेत एंट्री*

November 21,2023


मुंबई, नोव्हेंबर 2023 : सोनी सबवरील ’वागले की दुनिया - नई पिढी नये किस्से’ ही मालिका एका मध्यमवर्गीय कुटुंबाभोवती फिरते. दैनंदिन आयुष्यात त्यांना भेडसावणारी आव्हाने आणि अनुभवांचे विचार प्रवर्तक  चित्रण आपल्याला या मालिकेच्या कथानकात पाहायला मिळते. अलीकडच्या काही भागांत वागळे कुटुंबाने सलग 15 तास एकाच छताखाली राहण्याचा एक प्रयोग करून पाहिला आहे. तथापि, त्यांच्यात काही वाद उद्भवतात. यातून वागळे कुटुंबाला जाणीव होती की, सौहार्दपूर्ण राहण्याच्या प्रवासात त्याचे काही अडथळेदेखील असतात. यामुळे पुढचा प्रवास हा दीर्घ पल्ल्याचा असल्याचे त्यांना कळून चुकते.

मालिकेच्या आगामी काही भागांत प्रेक्षकांना नव्या पात्राच्या समावेशाची मेजवाणी पाहायला मिळणार आहे. ते आहे सेनोरिटा कपूर! प्रतिभावंत अभिनेत्री मोनाज मेवावाला ही भूमिका साकारत आहे. एक उच्चभ्रू दिवाळी पार्टी आयोजित करण्यासाठी हर्षदने (अमित सोनी) इव्हेंट प्लानर म्हणून तिची नेमणूक केली आहे. मात्र तिच्या सल्ल्यानुसार राजेश (सुमीत राघवन), डक्कू (दीपक पारीक) आणि वागळे कुटुंबाला निमंत्रित केले जाणार नसते. त्याच्या मध्यमवर्गीय स्टेटसमुळे ते पेज 3 पार्टीमध्ये शोभून दिसणार नसल्याने हा निर्णय घेण्यात आलेला असतो. हर्षद आपल्या उच्चभ्रू पार्टीत सर्वात जवळच्या मित्रांना निमंत्रित करणार की नाही, याची प्रेक्षकांना मोठी उत्सुकता लागली असून यामुळे मालिकेच्या कथानकाला व वेगळ कलाटणीही मिळणार आहे.  

मालिकेत सेनोरिटा कपूरची भूमिका साकारत असलेली मोनाज मेवावाला म्हणाली की, "मी यापूर्वीही सोनी सबच्या एका प्रोजेक्टमध्ये काम केलेले आहे. आता मी वागले कुटुंबातील एक भागही बनले आहे. माझ्यासाठी हा खूप आनंदाचा क्षण आहे. सेनोरिटा कपूर, म्हणजेच माझे पात्र या मालिकेच्या कथासूत्राला एक वेगळीच चव आणणार आहे. दिवाळीच्या खास क्षणांसाठी तिचा मालिकेतील प्रवेश हा एक रोमांचक अनुभव ठरणार आहे हे नक्कीच! हर्षदच्या या दिवाळी पार्टीत अनेक कलाटण्या आणि वळणे पाहायला मिळणार आहे. हे गुंगवून टाकणारे कथानक पाहण्यासाठी प्रेक्षकही तितकेच आतुर असणार आहेत."

साेनी सबवर दर सोमवार ते शनिवार रात्री 9:00 वाजता पाहायला विसरू नका - वागले की दुनिया : नई पिढी नये किस्से