Ajit Pawar: मोठी बातमी! 'या' कारणामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सुरक्षेत वाढ

August 12,2024

Ajit Pawar Security: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंरग्रेसचे नेते अजित पवार यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. गुप्तवार्ता विभागाच्या सूचनेनंतर पोलीसांनी अजित पवारांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार अजित पवार यांची विशेष काळजी घेण्याची सुचना गुप्तवार्ता विभागाने पोलीसांनी दिली होती, त्यामुळेच पोलीसांनी हा निर्णय घेतला आहे.

अजित पवारांचा आज मालेगाव, धुळे दौरा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. यानिमित्त त्यांनी जनसन्मान यात्रा काढली आहे. आज अजित पवार मालेगाव, धुळे आणि जळगाव दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते अनेक नेत्यांची व कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत, तसेच विधानसभेसाठी उमेदवारांची चाचपणी करणार आहेत. या दौऱ्यात आता अजित पवारांच्या सुरक्षेसाठी पोलीसांचा अतिरिक्त फौजफाटा तैणात करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

अजित पवारांच्या मालेगाव दौऱ्यात त्यांना धोका आहे अशी सुचना मिळाली आहे. त्यामुळे या दौऱ्यावेळी काळजी घेण्याच्या सूचना पोलीसांना मिळाल्या आहेत. अनेक दहशतवादी संघटनांकडून मालेगाव, धुळे आणि जळगाव या भागात संशयास्पद हालचाली होत असल्याची सुचना मिळाली आहे. त्यामुळेच पोलीसांनी अजित पवारांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकसभा निवडणुकीतील यशानंतर विधानसभेसाठी मोर्चेबांधणी सुरु

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पडल्यानंतर पक्षात शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट निर्माण झाले आहेत. दोन्ही गटांनी लोकसभेच्या निवडणूकीत आपले उमेदवार दिले होते. शरद पवार गटाने 10 जागा लढवल्या होत्या, यापैकी 8 जागांवर त्यांना विजय मिळाला आहे. तर अजित पवार गटाने 5 पैकी केवळ एका जागेवरच विजय मिळवला होता. बारामतीत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचाही पराभव झाला होता.

लोकसभा निवडणुकीत आलेले अपयश विधानसभा निवडणुकीत टाळण्यासाठी अजित पवार आतापासूनच सक्रीय झाले आहेत. ते आपल्या दौऱ्यात मोर्चेबांधणी करत असून योग्य उमेदवारांची चाचपणीही करत आहेत. त्यामुळे अजित पवाराच्या आज होणाऱ्या मालेगाव, धुळे आणि जळगाव दौऱ्याला खास महत्न निर्माण झाले आहे.