जीएमएमसीओ इंडियाच्या बुटीबोरी आणि हिंगणा कारखान्यांचे श्री नितिन गडकरी यांच्या हस्ते उद्धाटन

March 17,2025

नागपूर : सी के बिर्ला उद्योग समूहातील जीएमएमसीओ इंडिया च्या नागपूरमधील बुटीबोरी आणि हिंगणा येथील संपूर्ण सेवा आणि पुरवठा कारखान्यांचे उद्घाटन आणि कार्यान्वितीकरण झाल्याचे कंपनीने जाहीर जाहीर केले आहे.  

हे  एकात्मिक कारखाने म्हणजे जागतिक गुणवत्तेची दुरुस्ती, पुनर्बांधणी, आणि सुट्या भागांचे वितरण अशी कामे होणारे केंद्र ठरणार असून देशभरातील ग्राहकांना सेवा पुरविण्याच्या दृष्टीने कळीचे ठरतील. यासाठी  महाराष्ट्र , मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात आणि गोवा अशा व्यापक क्षेत्रातील ग्राहकांवर लक्ष केन्द्रित केले जाईल.  कारखान्यांचे उदघाटन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभागाचे मंत्री श्री नितिन गडकरी यांनी केले.  

सुमारे 14 एकर क्षेत्रात उभारलेले हे बुटीबोरी आणि हिंगणा कारखाने प्रगत सेवा, यंत्रांची तसेच घटकांची पुनर्बांधणी आणि सुट्या भागांचा विस्तृत साठा यांसह सक्षम असून ग्राहकांच्या विविध गरजा एकाच ठिकाणी पूर्ण करू शकतील.

बुटीबोरी कारखान्याच्या उद्घाटन समारंभात  जीएमएमसीओ इंडिया चे व्यवस्थापकीय संचालक श्री चन्द्रशेखर व्ही म्हणाले,  “ आमच्यासाठी हा गर्वाचा क्षण आहे. गेली काही दशके आम्ही सातत्याने व्यवसायवृद्धी केली आहे आणि हा विस्तार म्हणजे आमच्या “ग्राहक प्रथम” आणि उच्च कार्यक्षमता या निष्ठेची पावती आहे. आमच्या ग्राहकाना कमीत कमी वेळात योग्य ती सेवा पुरविणे हे आमचे लक्ष्य आहे आणि बुटीबोरी आणि हिंगणा  कारखान्यांची आम्हाला हे लक्ष्य प्राप्त करण्यासाठी मदत होईल. ”

ते पुढे म्हणाले,  “ कंपनीने यंत्र पुनर्बांधणी केंद्र तसेच घटक पुनर्बांधणी केंद्र यांची क्षमता वाढविली आहे त्यामुळे आमचे भारतभरातील स्थान मजबूत होऊ शकेल. या विस्तारामुळे आम्ही भारताच्या पायाभूत क्षेत्राच्या प्रगतीतील आमची कामगिरी अधिक स्पष्ट करीत आहोत. यंत्रांचे आयुर्मान वाढवून व ती बंद राहण्याचा कालावधी कमी करून आम्ही खाणकाम, बांधकाम, ऊर्जा आणि वाहतूक या महत्त्वाच्या क्षेत्रातील टिकाऊ विकासाला हातभार लावत देशाची आर्थिक प्रगती आणि औद्योगिक स्वयंपूर्णता यासाठी योगदान देत आहोत. या विस्ताराद्वारे भारताच्या पायाभूत क्षेत्र विकासात मोठे योगदान देतानाच आमचे मध्ये आणि पश्चिम भारतातील स्थान मजबूत करत आहोत. ”


बुटीबोरी यंत्र पुनर्बांधणी कारखाना 10 एकर परिसरात उभारला असून त्याचे क्षेत्रफळ 1 लाख 40 हजार चौ. फूट आहे. यात हब वेअर हाऊस समाविष्ट असून तिथे 30 हजार हून अधिक सुटे भाग उपलब्ध आहेत. येथून दरमहा 45 हजार भाग उचलले जातील अशी अपेक्षा आहे. येथे प्रगत डिजिटल वेअर हाऊस व्यवस्थापन प्रणाली असून सुट्या भागांचा साठा योजक पद्धतीने केला आहे. येथे वितरित साठा धोरण वापरण्यात येणार असून त्यामुळे 24 ते 48 तासांत सुटे भाग पोचवून ग्राहकांचा यंत्र चालू राहण्याचा कालावधी वाढविता येईल.  

येथील स्टॉक यार्ड मध्ये 100 यंत्रे राहू शकतात. त्याची वार्षिक क्षमता 150 यंत्रांची आणि 750 हायड्रॉलिक सिलिंडर ची दुरुस्ती / पुनर्बांधणी करण्याची आहे. शिवाय या कारखान्यात वर्षाला 24000 हायड्रॉलिक होज असेम्ब्ली जोडण्याची क्षमता आहे.

हिंगणा येथील घटक पुनर्बांधणी कारखाना 4 एकर क्षेत्रात आहे आणि त्याचे क्षेत्रफळ 74 हजार चौ. फू. आहे ज्यात  घटक पुनर्बांधणी तसेच इंजिन आणि ट्रान्समिशन टेस्ट बेंच समाविष्ट आहेत. त्याची 750 इंजिन्स आणि 400 ट्रान्समिशन्स पुनर्बांधणी आणि संपूर्ण सुधारणा करण्याची वार्षिक क्षमता आहे.  याशिवाय या कारखान्यात NABL प्रमाणित प्रयोगशाळा आहे जेथे  वापरून झालेल्या तेलाचे 2,10,000 नमुने तपासण्याची सोय आहे. यंत्रांची स्थिती देखरेख करणे आणि प्रतिबंधात्मक दुरुस्ती आणि देखभाल यासाठी ग्राहकणा या प्रयोगशाळेच्या सेवेचा फायदा होईल. 

या कारखान्यात 250 कुशल कर्मचारी तसेच या उद्योगातील सर्वोत्कृष्ट पायाभूत सुविधा व सेवा, सुटे भाग तसेच पुनर्बांधणी हे सर्व एकात्मिक आहे.  बुटीबोरी आणि हिंगणा  कारखान्यांमुळे सेवा – दुरुस्ती यासाठी लागणारा वेळ घटेल, सुट्ट्या भागांची उपलब्धता सुधारेल आणि यंत्रांची स्थिती उत्तम ठेवण्यात मदत होईल.  या एकात्मिक दृष्टीकोनामुळे ग्राहकांचा एकूण मालकी खर्च कमी होईल, यंत्रांचे आयुर्मान वाढेल आणि प्रकल्प वेळेत पूर्ण होतील याची खात्री होईल.