ट्रक चोरी करणाऱ्या टोळक्याला छत्तीसगढमध्ये अटक

August 10,2020

नागपूर : १० ऑगस्ट - कळमना  हद्दीतून ट्रक चोरी करणार्या ट्रक चोरांना कळमना पोलिसांनी छत्तीसगड पोलिसांच्या सहकार्याने अखेर अटक केली. त्यांच्याकडून २६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आहे.

प्राप्त माहितीनुसार,३0 जुलैला सायंकाळी ५ वाजताच्या आधी फिर्यादी शेख मोहतसिम इमाम बक्श (२८) रा. भाजीमंडी कोळसा टाल मशिदजवळ, जुनी कामठी यांनी टाटा कंपनीचा बारा चाकी ट्रक क्र. एम.एच/१६/सी.सी./६७९९ कि.अं. २५ लाख रु. ट्रकला कोणतीही बुकिंग नसल्यामुळे तो रिलायन्स पेट्रलपंप, जुना कामठी रोड कळमना येथे पार्किंग करून ठेवला होता. फिर्यादी यांना ३0 जुलैला त्या ट्रकची गरज भासल्याने ते ट्रकजवळ गेले असता नमूद ठिकाणी पार्किंग करून ठेवलेला ट्रक दिसून आला नाही. फिर्यादीने आजूबाजूच्या परिसरामध्ये नमूद ट्रक शोधला. परंतु त्यांना तो दिसून आला नाही. फिर्यादी यांनी ट्रक अज्ञात चोरट्याने चोरून नेला, अशी तक्रार कळमना पोलिस ठाण्यात केली होती. ट्रक चोरीच्या गुन्ह्य़ाच्या शोधात पोलिस पथक असताना सहा. पोलिस निरीक्षक राठोड यांच्या पथकाला ट्रकबाबत माहिती मिळून आल्याने त्यांनी छत्तीसगड पोलिसांना संपर्क करून त्यांना घटनेबाबत व आरोपीबाबत माहिती दिली. अर्जुनी जि. धमतरी छ. ग. यांनी आरोपींना पकडून त्यांच्याकडून १ टाटा कंपनीचा बारा चाकी ट्रक क्र. एम. एच. १६ सी.सी. ६७९९, टाटा इंडिगो चार चाकी गाडी क्र. सी.जी. 0४ / एच.बी. ६१६0, एक रिअल मी कंपनीचा मोबाईल फोन आणि एक विवो कंपनीचा मोर्बाइल फोन असा एकूण २६.६0 लाख रु. माल हस्तगत केला आहे. आरोपींना न्यायालय जि. धमतरी छ.ग. यांच्याकडून आरोपींना अटक करण्याची परवानगी घेऊन आरोपींना जि. धमतरी छ.ग. मध्यवर्ती कारागृह येथून ताब्यात घेऊन त्यांना नमूद गुन्ह्य़ामध्ये अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक, विश्वनाथ चव्हाण, सहा. पोलिस निरीक्षक, उल्हास राठोड, पोहवा किशोर देवांगण, संजय कोटांगळे, नापोशि मनीष बुरडे, पोशि मनोज बहुरूपी, अशोक तायडे यांनी पार पाडली.