वर्धा जिल्ह्यात २ लाखांचा प्रतिबंधित तंबाखू जप्त

August 10,2020

वर्धा : १० ऑगस्ट - देवळी पोलिसांनी भोंग सभागृहामागील एका व्यापारी प्रतिष्ठानावर छापा टाकून दोन लाख रुपयांचा प्रतिबंधित तंबाखू जप्त केला. याबाबत उपनिरीक्षक अरविंद शिंदे यांच्या तक्रारीनुसार व्यापारी हरिदास विठोबाजी वैद्य रा. देवळी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई काल रात्री ८.३0 वाजतापासून ९ वाजतापयर्ंत करण्यात आली. आज त्याबाबत दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांना या व्यापारी प्रतिष्ठानातून प्रतिबंधीत तंबाखू विकला जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार व्यापारी प्रतिष्ठानच्या गोदामावर पोलिसांनी छापा टाकला असता, त्यांना झिलगोल्ड, राजनिवास, दादा ब्लॅक, पानपराग, विमल, व्ही १, ईगल, गाय छाप, मिराज, ब्लॅक लेबल च्युइर्ंग तंबाखू माणिकचंद , जी ४ ग्रीन, भाग्य च्युईग, झेन माझा १0८, रजनीगंधा, रार्जशी,कॅरेट पानमसाला असा २,0१,२२0 रू.चा तंबाखूसाठा मिळाला. पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला