गुराख्याला वाघाने ठार मारले

August 10,2020

चंद्रपूर : १० ऑगस्ट - जंगलात जनावरे चराईसाठी घेऊन गेलेल्या गुराख्यावर वाघाने हल्ला करून ठार केले. हि घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली. 

अण्णाजी नारायण कूथे (४८) असे मृतकाचे नाव आहे. ब्रम्हपुरी तालुक्यातील परसोडी येथील अण्णाजी कुथे हे शनिवारी उत्तर वनपरिक्षेत्र कक्ष क्र. १३६ या परिसरात गुरे चारण्यासाठी गेले होते. तेव्हाच दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला चढवून त्यांना ठार केले. बराचवेळ लोटूनही ते घरी परतले नाही म्हणून घरच्यांनी जंगल परिसर घातले तेव्हा त्यांचा मृतदेह पडून होता. 

या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी घटनास्थळाला भेट दिली.