कत्तलीसाठी नेण्यात येणारे २३ जनावरे अकोला पोलिसांनी पकडली

August 10,2020

अकोला : १० ऑगस्ट - अमरावतीवरून अकोल्याकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरून निर्दयतेने कोंबून जनावरे कत्तलीसाठी वाहून नेत असताना बोरगावमंजू  पोलिसांनी नाकेबंदी करून मालवाहू दोन पिकअप गाडी पडकून २३ जनावरांना रविवारी रात्री जीवदान दिले. दरम्यान, चार जणांना ताब्यात घेऊन विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी गस्तीवर असलेल्या पोलिसांना माहिती मिळाली की अमरावतीकडून दोन मालवाहू पिकअपमधून अवैधरित्या कोंबून निर्दयतेने गुरे वाहून नेत  आहेत. या माहितीवरून बोरगाव मंजू बस थांब्यावर ठाणेदार हरीश गवळींसह पोलिसांनी नाकेबंदी करून   गाडी क्र. एमएच ३० बिडी २४६४ व पिकअप गाडी क्र. एमएच ३० बिडी २५१७ या दोन्ही मालवाहू पिकअप वाहने थांबवली. अधिक चौकशीसह तपासणी केली असता सदर  वाहनात अवैधरित्या निर्दयतेने कोंबलेले २३ जनावरे मिळून आले. 

दरम्यान,  सदर वाहनातून चार जणांना ताब्यात घेतले असता शेख रफिक शेख रज्जाक, शेख समीर शेख जमील,शेख वकील शेख शकील, शेख फारुख शेख शेख मतीन असे आरोपींची नावे  आहेत. सदर जनावरे विनापरवाना अवैधरित्या कत्तलीसाठी जात असल्याचे तपासाअंती निष्पन्न झाले. आरोपींकडून दोन पिकअप वाहनासोबत २३ जनावरे असा एकूण १३ लाख ६० हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.