संस्कृत ही इतर भाषांना जोडणारी भाषा - प्रा. श्रीनिवास वरखेडी

August 10,2020

नागपूर : १० ऑगस्ट - सर्व प्राकृतिक भाषांचे आगळेवेगळे महत्व आहे. या भाषांचे स्वतंत्र असे आपले अस्तित्व आहे. परंतु मराठीसह इतर भारतीय भाषांमध्ये संस्कृतचे बहुतांश शब्द आहेत. त्यामुळे संस्कृत भाषा ही इतरांना जोडणारी भाषा असल्याचे प्रतिपादन कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. श्रीनिवास वारखेडी यांनी केले. 

भारत-भरती नागपूर आणि कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठातर्फे संस्कृत सप्ताहानिमित्त संस्कृत आणि भारतीय भाषा या विषयावर आभासी व्याख्यान पार पडले. यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रा. वरखेडी म्हणाले, संस्कृत भाषा ही इतर भाषांची जननी नसून सर्व भाषांची माता आहे. कारण मराठीसह तामिळ,तेलगू, पंजाबी,गुजराती आदी भाषांत वापरण्यात येणारे बहुतांश शब्द हे संस्कृतमधले आहेत. संस्कृत भाषा ही  सर्वव्यापी आहे. तिच्या अस्तित्वाशिवाय  कोणतीच भाषा नाही. 

युरोपच्या भाषेतील बरेचसे शब्द, भाषा हे लॅटिन आणि ग्रीकशी जुडले असल्याचे सांगितले जाते. परंतु, या भाषांमध्ये एकमेकांना जोडण्याचे सामर्थ्य नसून त्यात भेभाव जाणवतो. परंतु सर्व भाटिया भाषांना जोडण्याचे तत्व संस्कृतमध्ये आहे. संस्कृत भाषेला इतरांसमोर ठेवले तर त्याला क्लासिकल भाषा असे संबोधले जाते. क्लासिकल भाषा म्हणजेच प्राचीन भाषा होय. संस्कृतची प्राचीनता इतर भाषेला आहे त त्यामुळे संस्कृत भाषेला हा विशेषण नको. ज्या भाषा मृतावस्थेत आहेत त्यांना क्लासिकल असे संबोधले जाते. भारतावर काहींनी आक्रमण केले. त्यावेळी अनेकांनी स्वतःच  संस्कृतीविषयी ज्ञान घेतले. संस्कृतशिवाय भारतीय भाषा नाही. संकस्क्रुत ही  संस्कारयुक्त भाषा आहे. इंडियाला भारताकडे नेणारी भाषा आहे. सध्या इंग्रजीच्या मोहिनीमुळे सर्व भाषा मूर्च्छित झाल्या आहेत परंतु यातून मुक्तीसाठी संस्कृत भाषा हा एकमेव पर्याय आहे. सर्व भाषांना जीवित ठेवण्याचे सामर्थ्य संस्कृत भाषेत आहे. असेही प्रा. वरखेडी म्हणाले. कार्यक्रमाची सांगता शांतीमंत्राने झाली. प्रास्ताविक व आभारप्रदर्शन रमेश पटेल यांनी केले.