गोंदिया जिल्ह्यात आज ४३ कोरोना पॉझिटिव्ह

August 10,2020

गोंदिया : १० ऑगस्ट : गोंदिया  जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढतांना दिसत आहे. आज जिल्ह्यात ४३  कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याचा अहवाल गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विषाणू चाचणी प्रयोगशाळेतून प्राप्त झाला आहे.तर ८ रुग्ण कोरोनातुन बरे झाल्याने आज त्यांना सुट्टी देण्यात आली.

कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या ४३ रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण बाधित रूग्णांची संख्या ६४३ झाली आहे. पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत असल्यामुळे क्रियाशील रुग्ण संख्या वाढत आहे. क्रियाशील रुग्ण संख्या आता २७७ झाली आहे.यातील दोन रुग्ण उपचारासाठी बाहेर राज्यात आहे.

जिल्ह्यात आज जे  ४३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आहे, त्यामध्ये गोंदिया शहरात ११ रुग्ण आढळले असून यामध्ये शास्त्री वार्ड, रेल्वे कॉलनी, सिव्हिल लाईन, वसंतनगर येथील प्रत्येकी एक रुग्ण आणि सात रुग्ण हे भीमनगर येथील आहेत.सडक/अर्जुनी तालुक्यात आठ रुग्ण आढळून आले असून पांढरवाणी, केसलवाडा व मंडिटोला येथे प्रत्येकी एक रुग्ण आणि सौंदड येथे पाच रुग्ण,तिरोडा तालुक्यात पाच रुग्ण आढळले असून यामध्ये सरांडी, बिरसी येथे प्रत्येकी दोन व एक रुग्ण हा खोडगाव येथील आहे. आमगाव तालुक्यातील शिवणटोला व कुणबीटोला येथे प्रत्येकी एक रुग्ण, पदमपुर येथे दोन रुग्ण आणि आमगाव येथे चार रुग्ण,सालेकसा तालुक्यात ११ रुग्ण आढळले असून यामध्ये गोरे येथे तीन, चेहारीटोला, तिरखेडी,मुरूमटोला येथे प्रत्येकी एक रुग्ण, धानोली येथे दोन व तीन रुग्ण सालेकसा येथे आढळून आले आहे. 

कोरोनातून जे ८ रुग्ण बरे झाले त्यांना आज सुट्टी देण्यात आली.यामध्ये गोंदिया तालुक्यातील चार रुग्ण असून  मुंडीपार,सेजगाव व गोंदिया शहरातील रेलटोली येथील प्रत्येकी एक रुग्ण आणि गोंदियाच्या सिंधी कॉलनीतील एक रुग्ण आहे.सडक/अर्जुनी तालुक्यातील हलबीटोला येथील एक रुग्ण, देवरी तालुक्यातील भागी आणि परसटोला येथील प्रत्येकी एक रुग्ण आणि एक रुग्ण हा अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध येथील  आहे.आतापर्यंत ३३२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.