रेल्वेच्या उच्चंदाब विद्युततारांच्या संपर्कामुळे १ मृत दोघे गंभीर

August 11,2020

गोंदिया : ११ ऑगस्ट - रेल्वेच्या उच्चदाब विद्युततारांच्या संपर्कात आल्याने एका युवकाचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना आज ११ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता  गोंदिया तालुक्यातील सौंदड रेल्वे स्टेशनपासून २०० मीटर अंतरावर घडली. करण जयेंद्र राऊत (१६) असे मृतकचे तर निलज देवानंद राऊत (१८) व नयन विनायक राऊत (१८) सर्व रा.खोडशिवणी अशी जखमींची नावे आहेत.

 मृतक करण व त्याचे दोघे मित्र हे स्पर्धा परीक्षेच्या तयारीतंर्गत शारीरिक सुदृढतेसाठी नेहमी प्रमाणे आज मंगळवारी सकाळी खोडशिवणी- सौंदड रेल्वे मार्गाने धावण्यासाठी गेले. तत्पूर्वी साडेसहाच्या सुमारास याच मार्गाने एक मालगाडी गेल्यावर सौंदड रेल्वेस्टेशनपासून २०० मीटर अंतरावर असलेल्या रेल्वे रुळावरच्या उच्चदाब विद्युत तारांमध्ये शॉटसर्कीट होऊन जवळपाच पाच मिनिटे मोठा आवाज झाला व विद्युत तारा रेल्वेरुळांवर पडल्याचे काही प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. दरम्म्यान याच परिसरातून ७ वाजता करण व त्याचे मित्र जात असताना तिघेही जीवंत विद्युत तारांना संपर्कात आले. यात करणचा विद्युत धक्क्याने जागीच मृत्यू झाला. तर निलज व नयन हे गंभीर जखमी झाले. यातील निलजची प्रकृती qचताजनक असल्याने त्याला गोंदिया येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर नयन वर सडक अर्जुनी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहे. दरम्यान पोलिस पाटील भृंगराज परसुरामकर यांनी रेल्वे विभाग व डुग्गीपार पोलिस स्टेशनला दिल्यावर पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे. तर रेल्वे विभाग दुरुस्तीच्या कामाला लागले. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.