भंडाऱ्यात सध्या घडते आहे वाघांचे दर्शन

August 11,2020

भंडारा : ११ ऑगस्ट - भंडारा जिल्ह्यामध्ये वाघांसाठी संरक्षित नागझिरा व कोका असे अभयारण्य राखीव ठेवण्यात आले आहेत. अभयारण्याला लागूनच ग्रामीण भागात रहिवासी गाव आहेत. त्यामुळे पावसाळ्यात निसर्गप्रेमींना व ग्रामिणांना व्याघ्र दर्शनाचा आनंद घेता येतो. दि. ९ ऑगस्ट रोजी चोवा / पहेला या जंगलव्याप्त परिसरात निसर्गप्रेमींना व्याघ्र दर्शन घडले. 

भंडारा अवघ्या २० किमी अंतरावर कोका अभयारण्य स्थित आहे. यामध्ये जैवविविधतेचा  आधार असलेले अनेक वन्यजीव, पशु पक्षी बघायला मिळतात. त्यातच गर्द  वनराई व निसर्गप्रेमींना विविध प्राण्यांचे दर्शन असा अलभ्यलाभ नेहमीच मिळतो. जिल्ह्यामध्ये कोका अभयारण्य वाघांसाठी राखीव आहे. तसेच गोसेखुर्द प्रकल्पालगतचा आजूबाजूचा परिसर हा सुद्धा जंगलव्याप्त असल्यामुळे येथे नेहमीच वाघ बघायला मिळतो.