भिंत कोसळून एक ठार

August 11,2020

नागपूर  : ११ ऑगस्ट - चंद्रपूरच्या ब्रम्हपुरी तालुक्यातील वांद्रा येथे आज  सकाळच्या सुमारास अतिवृष्टीने घराची भिंत कोसळून एक जण ठार झाला. चंद्रपूर तालुक्यात ही घटना घडली. मृत्यू झालेल्या इसमाचे नाव निलकंठ नथू पाल (वय ७५) असे आहे. ब्रम्हपुरी तालुक्यात दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप चालू होती अशातच वांद्रा येथील नीलकंठ पाल यांनी जुन्या घरातील पावसामुळे ओले झालेले साहित्य बाजूला करीत असताना घराची भिंत त्यांच्या अंगावर कोसळली. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

चंद्रपूरमधील ब्रम्हपुरी भागात गेले काही दिवस खूप पाऊस सुरू आहे. त्यामुळे तेथील काही भागात अतिवृष्टीचा फटका बसल्याची माहिती होती. गेल्या दोन-तीन दिवसात पावसाचा जोर फारच वाढला. त्यामुळे अनेक घरातही पाणी शिरले. ब्रम्हपुरी तालुक्यातील वांद्रा येथील रहिवासी नीलकंठ पाल यांच्या जुन्या घरात काही सामान ठेवले होते. पावसामुळे ते सामान ओले झाले. हे साहित्य बाजूला करीत असताना घराची भिंत त्यांच्या अंगावर कोसळली आणि काळाने त्यांच्यावर घाला घातला.

भिंत पडल्याने नीलकंठ पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच तलाठी विशाल कोरडे व मेंडकी चौकीचे पोलीस कॉन्स्टेबल खुशाल उराडे पवन डाकरे यांनी चौकशी करुन मृतदेह शवविच्छेदनाकरिता ब्रहम्हपुरीला पाठविले.