त्या अतिरेक्यांचा 26/11 च्या धर्तीवर हल्ला करण्याचा कट होता ः पंतप्रधान नरेंद्र मोदी

November 21,2020

नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर : जम्मू-काश्मीरच्या नागरोटा येथे जैश-ए-मोहब्बतच्या ज्या चार अतिरेक्यांना ठार मारण्यात आले. त्याची काश्मिरातील जिल्ल्हिा विकास परिषद निवडणुकीच्या काळात 26/11 च्या धर्तीवर हल्ला करण्याची योजना होती. आपल्या शूर जवानांनी त्याचा डाव उधळून लावला, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.

नागरोटा चकमकीतील तपासातून काही धक्कादायक खुलासे समोर आल्यानंतर पंतप्रधानांनी आज उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव आणि विविध गुप्तचर यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

जम्मू काश्मिरातील लोकशाही प्रक्रिया उद्धवस्त करण्याची योजना जैशने पाकिस्तानातच तयार केली होती. त्यानुसार या अतिरेक्यांना मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि स्फोटकांचा साठा उपलब्ध करण्यात आला होता. भारतीय गुप्तचर यंत्रणांची नजर जाणार नाही. यासाठी ट्रकची व्यवस्था करण्यात आली होती. पण आपल्या गुप्तचर यंत्रणा व जवानांनी पाकिस्तानचा हा डाव उधळला यासाठी मी जवानांचे अभिनंदन करतो असे ट्विट पंतप्रधानांनी या बैठकीत केले.