ओरिसात दाम्पत्याने विधानभवन परिसरात केला आत्महत्येचा प्रयत्न

November 25,2020

भुवनेश्वर : २५ नोव्हेंबर - ओडिशामध्ये कथितरित्या पाच वर्षीय मुलीवर बलात्कार आणि हत्या झाल्याप्रकरणी पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने, हतबल झालेल्या भुवनेश्वर येथे दाम्पत्याने विधानसभेसमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी तत्परता दाखवत त्यांना थांबवलं व रुग्णलयात पोहचवलं.

या दाम्पत्याचे म्हणणे आहे की, जुलै महिन्यात त्यांच्या पाच वर्षीय मुलीवर कथितरित्या झालेला अत्याचार व हत्येप्रकरणी पोलिसांनी कारवाई केलेली नाही. विशेष म्हणजे सध्या राज्य विधानसभेचे सत्र देखील सुरू आहे.

घटनेबद्दल म्हटले जात आहे की, आरोपी राज्याच्या मंत्र्याचे जवळचे नातेवाईक आहे. अशावेळी मंत्र्याच्या दबावामुळे पोलीस कारवाई करण्यापासून वाचत आहे. असा देखील आरोप करण्यात आलेला आहे की, काही दिवस अगोदर भोर येथे पोलीस महिलेच्या घरी पोहचले होते व तिला गप्प बसण्यास धमकावले गेले होते.