नागपुरात १००९ रुग्ण कोरोना मुक्त, २० रुग्णांचा मृत्यू

October 16,2020

नागपूर : १६ ऑक्टोबर - नागपूर जिल्ह्यात कोरोना कहर कमी होत चालला असून आज २० रुग्णांचा मृत्यू झाला असून ६७४ बाधित रुग्ण आढळले  आहेत तर १००९ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. 

आज १००९ रुग्ण कोरोना मुक्त झाले असून कोरोनमुक्तीचा एकूण  संख्या ७९८५३ इतकी आहे तर बरे होण्याचे प्रमाण ८८.९६ टक्के इतके आहे. २४ तासात २० रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतकांची संख्या २९१२ वर पोहोचली आहे. तर बाधितांची संख्या ६७४ असून आतापर्यंत ८९७६१ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. आज ७२८९ चाचण्या झाल्या असून ६९९६ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.