बाधित रुग्णांपेक्षा मुक्त रुग्णांची संख्या जास्त

October 20,2020

नागपूर : २० ऑक्टोबर - राज्याच्या उपराजधानीत कोरोना बाधित रुग्णांची संख्या उतरत चालली असून आज ४२७ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. तर १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ५८३ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. 

४२७ बाधित रुग्ण आढळले असून बाधित रुग्णांची संख्या ९१५५९  वर पोहोचली आहे तर कोरोनमुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ८२४७९ झाली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.६४ टक्के वर पोहोचले आहे. आज १३ रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यात ७ रुग्ण शहरातील ३ रुग्ण ग्रामीन तर ३ रुग्ण जिल्ह्याबाहेरील आहेत. एकूण मृत्युसंख्या २९७९ झाली आहे. आज ६७७५ चाचण्या झाल्या असून ५६५९ शहरात तर १११६ ग्रामीणमध्ये चाचण्या झाल्या आहेत. ६१४१ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.