नागपुरात कोरोनाचा प्रकोप वाढला

November 25,2020

नागपूर : २५ नोव्हेंबर - राज्याच्या उपराजधानीत परत एकदा कोरोनाचा प्रकोप सुरु झाला असून २४ तासात ३१९ रुग्ण बाधित झाले असून ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

आज ३१९ बाधित रुग्ण आढळले असून बाधितांची संख्या १ लाख ९ हजार ८८० वर पोहोचली आहे तर १३८ रुग्ण कोरोनमुक्त  झाले आहेत. आजपर्यंत १०१७३९ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. बरे होण्याचे प्रमाण ९३ टक्क्यांवरून ९२.५९ टक्क्यांवर आले आहे. आज शहरात २४ तासात ५ रुग्णांचा मृत्यू झाला त्यात शहरातील ३ ग्रामीण भागातील १ तर १ इतर जिल्ह्यातील रुग्णांचा समावेश आहे.  आजपर्यंत ३६२० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज ६३३३ चाचण्या झाल्या असून ५०९९ शहरात १२३४ ग्रामीण भागातील आहेत. ४५२१ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.