नापिकीला कंटाळून शेतकऱ्याने घेतला गळफास

February 24,2021

वर्धा : २४ फेब्रुवारी - कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून शेकापुर (बाई) येथील (३४) वर्षीय युवा शेतकऱ्याने  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ४ वाजताच्या सुमारास शेकापुर(बाई) गावात घडली. मृतक शेतकऱ्याचे  नाव संजय देवराव येळणे आहे.

संजय देवराव येळणे यांच्याकडे स्वमालकीची येळी शेत शिवारात कोरडवाहू ४ एकर शेत असून त्या शेतीवर त्यांची गुजराण होती. शेती करण्यासाठी यावर्षी संजयने बँक ऑफ इंडिया वडनेर शाखेकडून १ लाख रुपयाचे कर्ज घेतले, शेतीसोबतच दुसरा व्यवसाय करण्यासाठी त्याने एका खासगी बँकेकडून फायनान्स वर २0२0 रोजी महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर विकत घेतला. त्याचे ४ ते ५ लाख रुपयांचे कर्ज संजयकडे थकीत असून कोरोणाच्या काळात कर्जाची परतफेड करू न शकल्याने ते चिंतेत होते. यावर्षी उत्पन्नावर संपूर्ण भिस्त असताना उत्पन्नात घट झाल्याने यावर्षीही कर्जाची परतफेड करणे अशक्य झाले, त्याचबरोबर कर्जाचा वाढता डोंगर व त्यातही परत कोरोणाची महामारी यामुळे त्रस्त झालेल्या युवा शेतकर्याने २२ फेब्रु. च्या ४ वाजता शेकापूर (बाई) येथील आपल्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. हा प्रकार घराशेजारी मंडळींना माहीत होताच त्याला उपचारासाठी नेण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. याबाबत वडनेर पोलीसात माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वडनेर रुग्णालयात पाठविला आहे. पुढील तपास ठाणेदार राजेंद्र शेटे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. मृतकाच्या मागे पत्नी,मुलगा, मुलगी, आई-वडील असा परिवार आहे.